भारतीय वायू दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाला अपघात
देश बातमी

भारतीय वायू दलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाला अपघात

नवी दिल्ली : भारतीय वायुदलाच्या मिग-21 या लढाऊ विमानाचा गुरुवारी रात्री उशिरा पंजाबमधील मोगाजवळ अपघात झाला. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला आहे. नियमित प्रशिक्षणा दरम्यान मिग-21 या विमानानं राजस्थानच्या सूरतगढहून हवेत उड्डाण घेतलं होतं, अशी माहिती भारतीय वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब मध्ये मोगा जिल्ह्यातील लंगियाना खुर्द गावाजवळ रात्री 1 वाजताच्या सुमारास हे विमान कोसळले. अपघातानंतर विमानानं पेट घेतला. पश्चिम क्षेत्रात विमान कोसळल्यानंतर या विमानाचे पायलट स्क्वॉड्रन लीडर अभिनव चौधरी गंभीररित्या जखमी झाले होते. शुक्रवारी सकाळी पायलट अभिनव यांचा मृतदेह हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान, वायुदलाकडून या दु:खद घटनेवर शोक व्यक्त करण्यात आला आहे. या अपघाताबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती भारतीय वायू दलाने दिली आहे. यापूर्वीही १७ मार्च २०२१ रोजी एका मिग-२१ चा अपघात झाला होता. या अपघातात ग्रुप कॅप्टन ए गुप्ता यांचा मृत्यू झाला होता. त्यापूर्वी ५ जानेवारी रोजी राजस्थानच्या सूरतगढ एअरबेसवर एका मिग-२१ बायसन विमानाला अपघात झाला होता. आतापर्यंत मिग-२१ झालेला हा तिसरा अपघात आहे.