दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी घट; १८८ मृत्यूची नोंद
कोरोना इम्पॅक्ट बातमी

दिलासादायक ! राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आणखी घट; १८८ मृत्यूची नोंद

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचे दिसून येत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दिवसभरात राज्यात ९ हजार ४३ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, ८ हजार ४७० नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, आज राज्यात १८८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात आजपर्यंत एकूण ५७ लाख ४२ हजार २५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.९ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९८ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३ कोटी ९८ लाख ८६ हजार ५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५९ लाख ८७ हजार ५२१ (१५.०१टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ५८ हजार ८६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१९६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १ लाख २३ हजार ३४० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल (ता. २२)पासून १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झाली आहे. एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांकही काल (ता. २२) नोंदविण्यात आला आहे.