लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पुण्यात विकेंड लॉकडाऊनला नवे नियम
बातमी महाराष्ट्र

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; पुण्यात विकेंड लॉकडाऊनला नवे नियम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन राज्यसरकारने वाढवला असून २ दिवसांत नवी नियमावली जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पुण्यात अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवारही सुरु राहणार असून सकाळी ७ ते ११ या वेळेत या सेवा सुरु राहणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

विकेंड लॅाकडाउन रद्द करण्यात आला असून किराणा, भाजी, दूध, बेकरी अशा आस्थापनांचा यात समावेश असणार आहे. दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन १ जूननंतरही वाढवण्यात आला असल्याचे माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात सरसकट लॉकडाउन हटवला जाणार नाही, मात्र निर्बंध काही प्रमाणात शिथील होतील अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कालच्या (ता. २८) मंत्रीमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सरसकट लॉकडाउन उठवण्याबाबत निर्णय झाला नसल्याची माहितीही त्यांनी दिली. सध्या आहे त्या निर्बंधांमध्ये काही ठिकाणी शिथीलता आणण्याचा विचार झाला असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या संदर्भातली नियमावली येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.