राज्य सरकारची ११ ऑक्टोबरला बंदची हाक
राजकारण

राज्य सरकारची ११ ऑक्टोबरला बंदची हाक

मुंबई : उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून ठार मारल्याच्या घटनेमुळे देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारनेही या घटनेचा निषेध म्हणून 11 तारखेला महाराष्ट्र बंद पुकारला आहे. अत्यावश्यक सेवा सोडून हा बंद असणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वतीने शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात […]

राज्य सरकारचा मोठा निर्णय; शिर्डी विमानतळाभोवती वसवलं जाणार शहर
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; शिर्डी विमानतळाभोवती वसवलं जाणार शहर

शिर्डी : शिर्डी विमानतळाच्या भोवती सर्व सोयींनी युक्त असं एक शहर वसवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाची घोषणा केली. शिर्डी परिसराची या प्रकल्पासाठी निवड करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची आज […]

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री
राजकारण

भाजपने सहा महिन्यांत बदलले पाच मुख्यमंत्री

अहमदाबाद : पहिल्यांदाच आमदार झालेले भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विधानसभा निवडणुकांना जवळपास एक वर्ष बाकी असताना विजय रुपाणी यांनी दोन दिवसांपूर्वी अचानक पदाचा राजीनामा दिला होता. गुजरातमधील याच नेतृत्वबदलानंतर आता पुन्हा भाजपाशासित राज्यामध्ये नेतृत्व बदल होण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. भाजपने सहा महिन्यांत पाच मुख्यमंत्री बदलल्याच्या चर्चांणा वेग आला आहे. […]

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ
राजकारण

भूपेंद्र पटेल यांची गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी शपथ

नवी दिल्ली : भूपेंद्र पटेल यांनी आज (ता. १३) सोमवारी गुजरात राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर रविवारीच पक्षाने भूपेंद्र पटेल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र, मंत्रिमंडळात दुसरा कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आज गांधीनगर येथील राजभवन येथे एका कार्यक्रमात भूपेंद्र पटेल यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, […]

साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश
बातमी मुंबई

साकीनाका प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश

मुंबई : साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात या महिलेचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाची […]

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!
राजकारण

मोठी बातमी! राज्यपालांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा!

अहमदाबाद : गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शनिवारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले […]

राज्यातील अधिकाऱ्यांना दिलासा देणारा ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
राजकारण

राज्यातील अधिकाऱ्यांना दिलासा देणारा ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला. सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील हे अनुकंप धोरण […]

येडियुरप्पा यांचा राजीनामा; कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण?
राजकारण

येडियुरप्पा यांचा राजीनामा; कर्नाटकच्या नवीन मुख्यमंत्रीपदी कोण?

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर आज येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत. पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य […]

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोकण बातमी

दरड कोसळून मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा […]

भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला
बातमी महाराष्ट्र

भर पावसात स्वत: गाडी चालवत मुख्यमंत्री निघाले पंढरपूरला

मुंबई : मंगळवारी (ता. २०) आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात होणाऱ्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्निक रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांचा ताफा आज दुपारी अडीचच्या सुमारास पंढरपूरच्या दिशेने रावाना झाला. मुंबईमध्ये सतत कोसळणारा पाऊस आणि खराब हवामानामुळे त्यांना विमानाने पंढरपूरला जाता येणं शक्य नसल्याने ते रस्ते मार्गानेच पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. विशेष म्हणजे मागील वर्षीप्रमाणे […]