कोरोनाच्या नव्या प्रकाराने महाराष्ट्र हायअलर्टवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक
बातमी महाराष्ट्र

कोरोनाच्या नव्या प्रकाराने महाराष्ट्र हायअलर्टवर; मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा सुपर स्प्रेडर प्रकार समोर आल्यामुळे भारतातही खबरदरीच्या उपाययोजना लागू केल्या जात आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्री संचारबंदी लागू केली असून आज तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाचा नव्या प्रकारामुळे राज्य सरकार हायअलर्टवर आले आहे. आज होणाऱ्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत कोविड 19 संसर्गची परिस्थिती तसंच नव्या कोविड विषाणूंपासून कराव्या लागणाऱ्या उपाय योजना यावर चर्चा होणार आहे. राज्यातील महानगरपालिकांमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबदी लागू करण्यात आली आहे. तसेच, पुढील महिन्यात भारतात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. या संदर्भात पूर्व नियोजनावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू वेगाने पसरत असून या विषाणूची घातकता पुढील काही दिवसात कळेल त्यामुळे आजपासूनच राज्यात यासंदर्भात अधिकची सतर्कता बाळगली जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

त्यासाठी, कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला.