खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस
कोरोना इम्पॅक्ट बातमी

खूशखबर ! डिसेंबर अखेरपर्यंत तातडीच्या वापरासाठी मिळणार भारतीय लस

नवी दिल्ली : कोरोनासारखी महामारी आली आणि याचा त्रास प्रत्येकाला सहन करावा लागला. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे लस कधी येणार? पण कोरोनाच्या संकटाशी सामना करणाऱ्या भारतीयांसाठी एक खूशखबर आहे. भारतात डिसेंबर अखेरपर्यंत कोरोनाच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळेल, अशी आशा दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

डॉ. गुलेरिया पुढे म्हणाले, देशात सध्या सहा लशींवर काम सुरु आहे. यांपैकी दोन लशींचं शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुरु आहे. भारतात अनेक लशींच्या अंतिम टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत किंवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या लशींपैकी कोणत्याही लशीचा आपत्कालीन वापराची मंजुरी मिळण्याची शक्यत आहे. याद्वारे सार्वजनिक लशीकरणाच्या मोहिमेला सुरुवात होईल. कोल्ड चेन बनवणे, उपयुक्त स्टोअर वेअरहाऊस उपलब्ध करणे, रणनीती तयार करणे त्याचबरोबर लशीकरण आणि सिरिंजच्या उपलब्धतेसंदर्भात केंद्र आणि राज्यांमध्ये युद्धपातळीवर काम सुरु आहे.

आपल्याकडे चांगली माहिती उपलब्ध आहे. म्हणजेच लस चांगल्याप्रकारे सुरक्षित आहेत. लशींची सुरक्षा आणि प्रभावशीलतेशी कदापी तडजोड करण्यात आलेली नाही. ७०,००० ते ८०,००० स्वयंसेवकांना लस देण्यात आल्या आहेत. यांपैकी कोणावरही गंभीर प्रतिकूल परिणाम दिसून आलेला नाही. डेटावरुन लक्षात येतं की, अल्पावधीत लस सुरक्षित आहेत, असेही यावेळी गुलेरिया यांनी सांगितलं.