राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट; आता केवळ एवढे रुग्ण
कोरोना इम्पॅक्ट बातमी

राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट; आता केवळ एवढे रुग्ण

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका मात्र टळलेला नाही. अशात एक दिलासादायक बातमी समोर आली असून राज्यातील कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सातत्याने घटताना दिसून येत आहे. त्याचबरोबर आज दिवसभरातही नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत आणखीनच घट झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावरुन राज्यात कोरोनाच्या संसर्गाचे काही प्रमाणात नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही याबाबत ट्विटद्वारे माहिती दिली आहे. टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज ४३०४ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर नव्याने ४६७८ करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण १७ लाख ६९ हजार ८९७ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ६१ हजार ४५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९४.१ टक्के झाले आहे.