जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण
बातमी विदेश

जॅक मा यांची चीनच्या श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरण

बिजिंग : चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर अलिबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे, तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. हुरून लिस्टनुसार, 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र आता ते श्रीमंतांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर घसरले आहेत. चीन सरकारने जॅक मा यांच्या उद्योग साम्राज्याची चौकशी सुरू केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता. यानंतर चीनच्या रेग्युलेटर्सकडून अलीबाबा आणि अँट ग्रुपविरोधात केलेल्या कारवाई करण्यात आली होती. तसेच त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

यानंतर अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ टळला होता. या घटनाक्रमानंतर जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. या नव्या यादीनुसार, मिनरल वॉटर कंपनी नोनग्फूचे मालक झोंग शानशान, टेन्सेंट कंपनीचे पोनी मा आणि ई-कॉमर्स कंपनीचे पिनडूओडुओचे मालक कोलिन हुआंग हे या यादीत वरच्या स्थानावर आहेत.

दरम्यान, जॅक मा यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी बीजिंगमध्ये वादग्रस्त भाषण देत चीनच्या नियामक प्रणालीवर टीका केली होती. बँकिंग व्यवस्थेचाही त्यांनी समाचार घेतला होता. या भाषणापासूनच त्यांचं उद्योग साम्राज्य चीन सरकारच्या निशाण्यावर आहे. यानंतरच जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चिनी राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांच्याकडूनच आला होता.

यानंतर क्रिसमसच्या पूर्व संध्‍येला, जोवर आपल्या अलिबाबा गृप विरोधातील चौकशी पूर्ण होत नाही, तोवर देशाबाहेर जाऊ नये, असा आदेशही जॅक मा यांना देण्यात आला होता. या कारवाईनंतर जॅक मा फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. एवढेच नाही, तर चीन सरकारने त्यांना गायब केल्याचेही वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते.