अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर
देश बातमी

अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं; शेतकरी आंदोलनातील आजींचे कंगनाला प्रत्युत्तर

नवी दिल्ली : ”माझ्याकडे १३ एकर जमीन आहे. त्यामुळे मला १०० रूपयांसाठी कुठेही जाण्याची गरज नाही. आणि हो कोरोनामुळे कंगनाच्या हातात काम नसेल तर माझ्या शेतात इतर मजूंराप्रमाणे काम करू शकते.” असा खोचक टोला महिंदर कौर यांनी अभिनेत्री कंगना रानौतला लगावला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर  कर यांच्यावर अभिनेत्री कंगना रनौतला पैसे घेऊन शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्याचा आरोप केला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र महिंदर कौर यांच्यावर आरोप करणं आणि त्यांची खिल्ली उडवणं कंगनाला महागात पडत आहे. यावरून कंगनावर टिकेची झोड उठत आहे. आता त्याच वयोवृद्ध आजी म्हणजे भटिंडाच्या जंडियां गावातील महिंदर कौर यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यातून त्यांनी कंगनाला उत्तर दिलं आहे.

महिंदर कौर म्हणाल्या की, या अभिनेत्रीला पंजाब आणि पंजाबच्या शेतकऱ्यांची समज नाही. समज असती तर अशाप्रकारचं वक्तव्य कधी केलं नसतं. अशाप्रकारचं वक्तव्य करणं हे डोकं नसल्याचं लक्षण असतं. ती सरकारच्या भक्तीत मनात येईल ते बोलत आहे. तिला इतकंही नाही माहीत की, कुणाबाबत काय बोलावं. जेव्हा तिचं मुंबईतील ऑफिस तोडलं गेलं तेव्हा पूर्ण पंजाबने तिला साथ दिली होती.”

महिंदर कौर पुढे म्हणाल्या की, ”त्यांचं वय ८७ वर्ष आहे. आजही त्या शेतात काम करतात. त्या शेतकऱ्यांच्या संघर्षात कधीच मागे राहिल्या नाही आणि पुढेही राहिल्या नाहीत. त्या शेतकरी आहे त्यामुळे या आंदोलनात आपल्या शेतकरी भावांसोबत आली आहे. शेती करणं फार मोठी गोष्ट आहे. हे काही छोटं काम नाही. शेतातील प्रत्येक काम केलं आहे.’

त्या म्हणाल्या की, तिने एक महिला असून एका वयोवृद्ध महिलेच्या बाबतीत अशाप्रकारे वक्तव्य करण्याआधी विचार करायला हवा होता. हे वक्तव्य पंजाबच्या महिलांवर करण्यात आलं. त्यामुळे तिने माफी मागावी. पैशांसाठी काम करणारे शेतकरी आम्ही नाहीत, पैशांसाठी तेच काम करतात जे स्वत:ला विकतात. आम्ही भाडं घेणारे नाही तर लोकांना रोजगार देणारे आहोत’. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.