आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या
देश बातमी

आणखी एक सैराट! सासरच्या मंडळींनी दगडाने ठेचून तरुणाची हत्या

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी मराठीत आलेला चित्रपट सैराटच्या कहानीची पुनरावृत्ती गुजरातच्या बोटाद जिल्ह्यातील लिंबली गावचा रहिवाशासोबत घडली आहे. या तरुणाने आणि त्याच्या पत्नीने चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, त्याच्या सासरच्या मंडळींचा या विवाहाला विरोध होता. त्याच रागातून त्यांनी तरुणाची हत्या केली आहे. जयसुख असं मृत तरुणाचं नाव आहे. या तरुणाचा मृतदेह त्याच्या गावापासून […]

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून
देश बातमी

मुस्लीम तरुणाशी लग्न केल्याने वडिलांनी ८ वर्षांनी केला मुलीचा खून

नवी दिल्ली : इतर धर्मातील पुरूषाशी लग्न केल्याने ८ वर्षांनंतर स्वतःच्या मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सिद्दार्थ नगर येथील चिल्हीया परिसरात घडला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी घडली असून याप्रकरणी ५५वर्षीय मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. सुनीता तिचा शेजारी अब्दुल मोतीन सोबत २०१३ला मुंबईला पळून गेली. तिचे कुटुंबीय या नात्याच्या विरोधात होते. […]

लग्न न केल्याच्या कारणावरून निर्मात्याची आई वडिलांनीच केली हत्या
देश बातमी

लग्न न केल्याच्या कारणावरून निर्मात्याची आई वडिलांनीच केली हत्या

नवी दिल्ली : इराणी चित्रपट दिग्दर्शक बबाक खोर्रामदीन याची त्याच्या आई वडिलांनी निर्घृण हत्या केली आहे. लग्न न केल्याच्या कारणामुळे त्याची निर्दयीपणे हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून बॅगेत भरले होते. या प्रकरणी त्याच्या आई वडिलांना अटक करण्यात आली आहे. इराणमध्ये ऑनर किलिंगचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४७ वर्षीय बबाब खोर्रामदीन याने २००९ […]

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या
बातमी विदेश

पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून निर्घृण हत्या

कराची : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा एकाच हिंदू कुटुंबातील पाच जणांची गळा चिरून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मुलतान जिल्ह्यातील या घटनेत अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या केली आहे. पीडित हिंदू कुटुंब मुलतान जवळील रहीम यार खान शहरापासून 15 कि.मी. अंतरावर अबू धाबी कॉलनीत राहत होतं. घटनास्थळावरून पोलिसांनी चाकू व कुऱ्हाडीसह […]

भाजप कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या; चारही आरोपींना अटक
देश बातमी

भाजप कार्यकर्त्याची घरात घुसून हत्या; चारही आरोपींना अटक

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्याची त्याच्याच घरात घुसुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेजारी राहणाऱ्यांकडून निर्घृण हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगलपुरी परिसरात ही घटना घडली असून पीडित रिंकू शर्मा हा भाजपा युवा मोर्चा आणि विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता. हल्ल्यात जखमी झालेल्या रिंकू शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी हत्येचा गुन्हा […]

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद
देश बातमी

१८ महिलांची हत्या करणारा सिरीयल किलर अखेर जेरबंद

हैदराबाद : हैदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आलं, अठरा महिलांची हत्या करणाऱ्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला हैदराबाद पोलिसांनी जेरबंद केले आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे फक्त महिलांच्या हत्येचेच नाही तर अनेक गुन्हे या व्यक्तीविरोधात दाखल करण्यात आले आहेत. तर पोलिसांना नुकत्याच झालेल्या दोन महिलांच्या हत्येचं गूढ सोडवण्यातही यश आलं आहे. हैदराबाद शहर पोलीस टास्क फोर्सच्या […]

सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे बातमी

सुनेच्या हत्येची सुपारी देणाऱ्या सासऱ्याचीच आरोपींनी केली हत्या; पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुणे : दुसऱ्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात माणूस स्वतःच पडतो; अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. मात्र या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्ष पुण्यात आला आहे. सुनेच्या हत्येची सुपारी दिलेल्या आरोपींनी सासऱ्याचाच खून केला. विनायक भिकाजी पानमंद असं हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. ही घटना पुणे जिल्ह्यातील खेड येथे घडली आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड च्या म्हाळुंगे पोलिसांनी दोन आरोपींना […]