चमत्कारी औषधामुळे कोरोना बरा झाल्याचा दावा करणाऱ्याचा कोरोनामुळेच मृत्यू
देश बातमी

चमत्कारी औषधामुळे कोरोना बरा झाल्याचा दावा करणाऱ्याचा कोरोनामुळेच मृत्यू

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातून एक मोठी बातमी समोर आली असून चमत्कारी औषधामुळे कोरोना बरा झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्यध्यापकाचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आंध्र प्रदेशात एका माजी मुख्याध्यापकाने चमत्कारी औषध घेतल्यानंतर कोरोना बरा झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर या औषधाची मागणी वाढली होती आणि ते औषध घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मात्र आता कोरोनाचं चमत्कारी औषध घेऊन बरं झाल्याचा दावा करणाऱ्या माजी मुख्यध्यापकाचा कोरोनामुळेच मृत्यू झाला असल्याने आंध्रप्रदेशात खळबळ उडाली आहे. नेल्लोरे येथील कृष्णपटणम गावातील माजी मुख्यध्यापक एन कोटैय यांनी कोरोनावर चमत्कारी औषध घेतल्याचा दावा केला होता. त्यांनी यासाठी बी. आनंदैया यांनी तयार केलेल्या आयुर्वेदीक अंजनाचा दाखला दिला होता. मात्र, ते औषधही त्यांना वाचवू शकलं नाही. शुक्रवारी रात्री माजी मुख्यध्यापक एन कोटैय यांची ऑक्सिजन लेव्हल खालावल्याने त्यांना नेल्लोरमधील शासकीय जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला.

चमत्कारी औषध असल्याचा दावा करणारे आयुर्वेदिक चिकित्सक बी. आनंदैया यांच्या टीममधील तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचं रॅपिड अँटिजेन चाचणीतून समोर आलं आहे. तर २० गावकऱ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने त्यांचे आरटी-पीसीआर नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत.