अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर
बातमी महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या अडचणींत आणखी वाढ; ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून ईडीच्या चौकशीत महत्वाची माहिती समोर आली आहे. त्यांनी खाजगी बँकांकडून नियमांचं उल्लंघन करत कर्ज घेतल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता नियमांचं उल्लंघन करुन कर्ज पास करण्यासाठी देशमुखांनी नेमकं काय केलं होतं, याचा तपास ईडी आता करत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कर्ज म्हणून मिळालेली रक्कम देशमुख यांनी अशा कंपन्यांना ट्रान्सफर केली, ज्या कंपन्यांवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबियांचा हक्क आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे तसेच ईडीनं या कंपन्यांची चौकशी केल्यावर यातल्या काही कंपन्या खऱ्या तर काही फेक आहेत. त्यामुळे ईडी आता कर्ज घेतलेल्या पैशांचं देशमुख यांनी काय केलं याची चौकशी करत आहे.

दरम्यान, पोलिसांच्या बदल्यांमध्ये खासकरुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात होता, अशी कबुली आधीच सध्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला दिली आहे.