प्रतिक्षा संपली! केरळात मान्सूनचे दमदार आगमन
देश बातमी

प्रतिक्षा संपली! केरळात मान्सूनचे दमदार आगमन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची प्रतीक्षा सर्वांना लागून होती. अखेर मान्सून केरळात दाखल झाला आहे. स्कायमेट वेदरनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. देशात यंदा मान्सून दोन दिवस उशीरा दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, या सर्व अंदाजांना बाजूला करत अखेर मान्सून केरळात दमदार आगमन केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उत्तर अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअर, निकोबार, माया बंदर अशा भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे. तसेच केरळ, कर्नाटकची किनारपट्टी भाग, लक्षद्वीप या भागांमध्येही पावसाची येत्या काळात दमदार हजेरी असणार आहे.

दरम्यानच्या काळात समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळे मासेमारांनीही सतर्क रहावे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.