समीर वानखेडे यांचा धर्म कोणता? क्रांती रेडकरच्या पुराव्याने सर्वांची बोलती होईल बंद
बातमी मुंबई

समीर वानखेडे यांचा धर्म कोणता? क्रांती रेडकरच्या पुराव्याने सर्वांची बोलती होईल बंद

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (अंमली पदार्थ प्रकरणातील पंचाने अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. समीर वानखेडे हे मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. या संपूर्ण प्रकरणानंतर अभिनेत्री क्रांती रेडकर चांगलीच चर्चेत आली आहे. आपल्या पतीवर होत असलेल्या आरोपानंतर क्रांती रेडकर सोशल मीडियावर आपली बाजू मांडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रांती रेडकर विविध पद्धतीने आपल्या पतीवर होणाऱ्या टीकांवर प्रत्युत्तर देताना दिसत आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर वैयक्तिक हल्लेही केले जात आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या धर्माबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. समीर वानखेडे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यावर उत्तर दिले आहे. त्याचवेळी त्यांची पत्नी क्रांती रेडकर वानखेडे यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर पोस्ट करून आम्ही दोघे जन्मजात हिंदू असल्याचे म्हटले आहे.

समीर वानखेडे यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, त्यांचे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे हे 30 जून 2007 रोजी पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागातून निवृत्त झाले होते. त्याचे वडील हिंदू आहेत आणि आई स्वर्गीय झहिदा मुस्लिम होती. समीर वानखेडे यांनी पुढे सांगितले की, त्यांनी 2006 मध्ये डॉ. शबाना कुरेशीशी स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 अंतर्गत लग्न केले आणि 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2017 मध्ये त्यांनी क्रांती दीनानाथ रेडकर यांच्याशी लग्न केले. नवाब मलिक यांनी सोशल मीडियावरून केलेल्या आरोपामुळे आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

क्रांती रेडकर यांनी समीर वानखेडे यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये दोघेही हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न करताना दिसत आहेत. या फोटोंसह, क्रांती यांनी समीर वानखेडे यांनी प्रसिद्धीपत्रकात जे म्हटले होते त्याचा पुनरुच्चार केला आहे. क्रांती यांनी लिहिले आहे की, मी आणि माझे पती समीर जन्मतः हिंदू आहोत. आम्ही कधीही धर्म बदलला नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. समीरचे वडीलही हिंदू आणि आई मुस्लिम होती, त्या आता या जगात नाहीत. समीरचे पूर्वीचे लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झाले होते. 2016 मध्ये घटस्फोट झाला. आमचा विवाह 2017 मध्ये हिंदू विवाह कायद्यानुसार झाला होता. क्रांती यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्येही अशा अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये समीर वानखेडे यांचे समर्थन करण्यात आले आहे.