गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
राजकारण

गौतम अदाणींचा उल्लेख करत राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या ६ व्या दिवशी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्तावावर भाषण केलं. राहुल गांधी यांनी यावेळी भारत जोडो यात्रेतील अनुभवांची मांडणी करताना महागाई, बेरोजगारी, अग्निवीर योजना, शेतकऱ्यांचे मुद्दे, पीक विमा योजना आणि अदानी उद्योग समूह आणि हिंडेनबर्ग रिपोर्टवरुन हल्लाबोल केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मागील २० वर्षांत अदाणींनी भाजपाला किती रुपये दिले? असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यात जवळचे संबंध आहेत, असेही राहुल गांधी म्हणाले. ते आज (७ फेब्रुवारी) संसदेत बोलत होते.

हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू

“अगोदर मोदी अदाणी यांच्या विमानातून प्रवास करायचे. आता अदाणी हे मोदी यांच्या विमानातून प्रवास करतात. अगोदर हे फक्त गुजरातमध्येच व्हायचे, नंतर हे भारतात सुरू झाले. अदाणी यांनी भाजपाला मागील २० वर्षांत निवडणूक रोखे तसेच अन्य मार्गाने किती रुपये दिले?” अशी टीकाही राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी यांनी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचा विमान प्रवासातील फोटो दाखवला. नरेंद्र मोदी अदानी यांच्या विमानातून प्रवास करत असल्याचा फोटो देखील दाखवला.

अदानी हे नाव सर्वत्र ऐकायला मिळालं

तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमध्ये अदानी हे नाव सर्वत्र ऐकायला मिळालं, असं राहुल गांधी म्हणाले. “लोक भेटायचे त्यावेळी विचारायचे अदानी कोणत्याही व्यवसायात जातात तिथं यशस्वी होतात. स्टार्टअप चालवणाऱ्या युवकांनी सांगितलं आम्हाला देखील त्यांच्यासारखं यशस्वी व्हायचंय”, असं सागायचे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. २०१४ मध्ये गौतम अदानी जगभरातील श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या स्थानावर होते. ते दुसऱ्या स्थानावर कसे पोहोचले. नऊ वर्षांमध्ये कसली जादू झाली की ते दुसऱ्या क्रमांकावर पोहोचले, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.