तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर
देश

तुमच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील, पण हैदराबादचं नाव हेच राहिल; ओवेसींचे योगींना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या, आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” या वक्तव्याला एमआयएम प्रमुख असदुद्दीनओवेसी यांनी चोख प्रत्युत्तर दिले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

येथील महापालिका निवडणुकीमुळे हैदराबादमधील राजकीय वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते योगी आदित्यनाथ आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात वाकयुद्ध चांगलच रंगलं आहे. ज्यांना हैदराबादचं नाव बदलायचंय, त्यांच्या पिढ्या उद्ध्वस्त होतील. पण तरीही हैदराबादचं नाव बदलणार नाही, अशा शब्दांत ओवेसींनी योगींवर पलटवार केला आहे. ज्यांना शहराचं नाव बदलायचंय, त्यांना आता जनतेनंच प्रत्युत्तर द्यायचंय, असं म्हणत ओवेसींनी हैदराबादमधल्या मतदारांना आवाहन केले.

या निवडणुकीत भाजपकडून प्रचारासाठी केवळ डोनाल्ड ट्रम्प यायचे राहिले आहेत. ते जरी आले तरीही काही होणार नाही. कारण मोदींनी त्यांना हात देत अबकी बार ट्रम्प सरकार म्हटलं होतं. पण ट्रम्प खड्ड्यात पडल्याची टीका ओवेसी यांनी केली. शनिवारी झालेल्या सभेत योगी यांनी हैदराबादचे नाव बदलून भाग्यनगर करण्याचे आश्वासन दिले होते.