अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप
देश बातमी

अहमदनगरचा जवान अटकेत, फेसबुकवरून पाक महिलेला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप

नवी दिल्ली: हनी ट्रॅप रचण्यात आघाडीवर असलेल्या पाकिस्तानच्या जाळ्यात आणखी एक जवान सापडल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या बीएएसएफ जवानाला स्टेट ऑपरेशन सेलने शनिवारी न्यायालयात हजर केले. त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला उद्या पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

महाराष्ट्रातील अहमदनगरमधील सासेवाडी गावाचा प्रकाश काळे हा ऑगस्ट २०१९ मध्ये येथे तैनात झाला होता. तो पाकमधील महिलेच्या संपर्कात होता. ती महिला पाकिस्तानच्या इंटेलिजन्स ऑपरेटरची हेर होती. ती संस्था इतर गुप्तचर संस्थांना माहिती पुरवते. सध्या बीएसएफ जवानाची चौकशी सुरू असून त्याच्याकडून अनेक गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे.

बीएसएफ जवान प्रकाश काळे फेसबुकच्या माध्यमातून महिलेच्या संपर्कात आला होता. ऑगस्ट २०२०पासूच महिलेला त्याने बीएसएफच्या हालचालींची माहिती देणे सुरू केले. त्याने बीएसएफ जवानांचा एक ग्रुपही बनवला होता. तो स्वत: त्याचा अॅडमिन होता. जवानांची ड्यूटी किंवा गस्तीबाबत जी माहिती ग्रुपवर टाकली जायची ती महिलेपर्यंत आपोआप जायची. महिला भारतीय सिमचा वापर करत होती आणि ती त्याच ग्रुपमध्ये सामीलही होती. या संस्थेचा मुख्य हेतू बीएसएफच्या प्रत्येक हालचालीची माहिती घेणे हा होता.