योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर,  भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना
देश

योगी आदित्यनाथांची हैदराबादवर नजर, भाग्यनगर नामांतर करण्याची केली गर्जना

उत्तर प्रदेशातील शहरांची नावं बदलण्यासाठी प्रसिद्ध असलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सध्या प्रचारासाठी तेलंगणात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी हैदराबादचं नाव बदलण्याचे आश्वासन दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

 

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. आज योगी आदित्यनाथ यांनी मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी गर्जना योगी आदित्यनाथ यांनी केली.