मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक
बातमी मुंबई

मोठी बातमी ! सचिन वाझेच्या पोलिस दलातील सहकाऱ्याला अटक

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयने सचिन वाझे यांचे सीआययूतील सहकारी सहायक पोलीस निरीक्षक रियाझ काझींना अटक केली आहे. काझी यांच्यावर एनआयएकडून वाझेला मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

वाझेची चौकशी केल्यानंतर त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एनआयएच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काझी देखील अँटिलिया प्रकरणात सामील आहेत. या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यास त्यांनी वाझेची मदत केल्याचा आरोप आहे.

एनआयएने काझी यांची अनेक दिवस चौकशी केलेली आहे. काझी यांनी पुरावे नष्ट करण्यास आणि या गुन्ह्यात वाझे यांना मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे यांच्या घरातून सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर घेऊन जाणारा काझीच असल्याचे सांगण्यात येत आहे. कारच्या बनावट नंबर प्लेट खरेदी केल्याच्या प्रकरणातील आरोपीही असल्याचे मानले जाते. काझी यांच्या एनआयए कोठडीसाठी आज न्यायालयात हजर केले जाईल. सचिन वाझेला याआधीच एनआयएने अटक केली होती. सध्या ते तुरुंगात आहेत. त्याच्यावर अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्येच्या कटाचा आरोपही आहे.