सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम
बातमी महाराष्ट्र

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ड्रेसकोड लागू; काय आहेत नियम

मुंबई : आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते नाही यावर कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. सरकारकडून ड्रेस कोडबाबत नवे नियम ठरवले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दुसरीकडे महिला कर्मचाऱ्यांना देखील नवा ड्रेसकोड ठरवून देण्यात आला आहे. महिलांना कार्यालयात साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालणे बंधनकारक असणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजे शुक्रवारी सर्व कर्मचाऱ्यांनी खादीचे कपडे घालावेत असं देखील नव्या नियमांत सांगितले आहे.

मंत्रालयात आता जिन्स आणि टी शर्ट घालता येणार नाही. शिवाय गडद रंगाचे चित्रविचित्र कपडे घालण्यास राज्य सरकारकडून मनाई घालण्यात आली आहे.

काय आहेत ड्रेसकोडचे नवे नियम
– सर्व कर्मचाऱ्यांचा पेहराव व्यवस्थित असावा.
– जिन्स आणि टी शर्ट घालू नये.
– महिला कर्मचाऱ्यांनी साडी, कुर्ता, सलवार, चुडीदार, दुपट्टा, ट्राऊझर घालावे.
– पुरूष कर्मचाऱ्यांनी शर्ट आणि पॅंट घालावी.
– कार्यालयात स्लिपर्सचा वापर करू नये.
– गडद आणि चित्रविचित्र कपडे घालू नयेत.
– शक्यतो बूट वापरावा.