गोव्यात होणार बुमराहचं लग्न; तारीखही ठरली
क्रीडा

गोव्यात होणार बुमराहचं लग्न; तारीखही ठरली

मुंबई : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. यासाठी त्याने इंग्लंडविरुद्धची चौथी टेस्ट आणि टी-20 सीरिजमधून माघार घेतली आहे. त्याचा विवाहसोहळा गोव्यात होणार असून स्पोर्ट्स कीडाने दिलेल्या वृत्तानुसार स्पोर्ट्स एँकर संजना गणेशनसोबत बुमराहचं 14 आणि 15 मार्चला लग्न होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संजनाने आयपीएल आणि 2019 वर्ल्ड कपमध्ये एँकरिंग केलं आहे. पुण्याच्या प्रसिद्ध कॉलेजमध्ये संजनाने इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं, पण यानंतर ती मॉडेलिंगच्या क्षेत्रात वळली. 2014 साली ती मिस इंडियाच्या फायनलपर्यंत पोहोचली होती.

संजनाने एमटीव्हीचा रियलिटी शो स्पिल्ट्स व्हिलामधून टीव्हीवर पदार्पण केलं. 2013 साली तिने फेमिना गॉर्जियस हा पुरस्कार जिंकला होता.