राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया
देश बातमी

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर हृदय शस्त्रक्रिया

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हृदयावर दिल्लीत शस्त्रक्रिया करण्यात आली. मंगळवारी दिल्लीतील एम्स रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे राष्ट्रपती भवनातून जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रामनाथ कोविंद यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले होते. तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाचे त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष आहे, असेही निवेदनामध्ये म्हटले आहे.

रामनाथ कोविंद यांना गेल्या शुक्रवारी लष्कराच्या रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आल्यानंतर शनिवारी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. मंगळवारी सकाळी त्यांच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.