कराडमध्ये झालेल्या अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू; सात जखमी
पुणे बातमी

कराडमध्ये झालेल्या अपघातात पुण्यातील तिघांचा मृत्यू; सात जखमी

पुणे : पुण्यातील कात्रज परिसरातील तिघांचा कराडजवळ झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातात रविराज साळुंखे (वय ३०), राहुल दोरगे (वय २८) स्वप्नील शिंदे तिघेही रा. कात्रज अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत. पुणे बंगलोर महामार्गावरील पाचवड फाटा ते आटके टप्पा परिसरात हा अपघात झाला. या भिषण अपघातात अन्य सातजण जखमी झाले आहेत. गणेश काळे (वय ३०) बाळासाहेब गदळे, (वय ३०) तुषार गावडे (वय२७) चंद्रकांत कावरे (वय ७६), पूजा ओंबासे (वय ४०) भरत ओंबासे (४५), सेजल ओंबासे (वय १८) जखमी झाले आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सायंकाळी पावणे आठच्या सुमारास इनोव्हा व स्विफ्ट कार एकमेकांना ओव्हर टेक करण्याच्या प्रयत्नात असताना अपघात झाला. स्वीफ्ट कारने ठोकर दिल्याने इनोव्हा कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्या पाठोपाठ स्वीफ्ट कारही त्यावर आदळली. त्यात तीन जण जागीच ठार झाले. दोन्ही वाहनांतील पाचजण जखमी आहेत. त्यात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही कार पुण्याच्या कात्रज भागातील आहेत. जखमींना कृष्णा व सह्याद्री रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर बाजूने पुण्याकडे निघालेल्या इनोव्हा व स्विफ्ट डिझायर कार एकमेकांना ओव्हरटेक करून भरधाव वेगाने निघाल्या होत्या. पाचवड फाटा ते आटके टप्पा दरम्यानच्या एका शॉपीसमोर आल्यावर स्वीफ्ट कारची इनोव्हाला धडक बसली. त्यात भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांची धडक बसल्याने इनोव्हा कार झाडावर आदळून मोरीत कोसळली. त्यापाठोपाठ स्वीफ्टकारही त्यावर आदळल्याने दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला होता. त्यात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर सहाजण जखमी आहेत. ठार झालेल्यांची ओळख अद्यापही पटलेली नाही. अपघात इतक्या जोरात झाला की, त्याच्या आवाजाने परिसर हादरला होता. जोराचा आवाज झाल्याने त्या भागातील नागरिक मदतीला धावून आले. त्या परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनीही मदत कार्य राबविले. अपघाताची माहिती समजताच महामार्ग पोलिसही तेथे पोचले. त्यापाठोपाठ तालुका पोलिसही दाखल झाला होते. महामार्ग पोलिस मदत केंद्राच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. महामार्ग पोलिस, वाहतुक पोलिस, महामार्ग देखभाल विभागाचे दस्तगीर आगा, उदय यादव, मधुकर साळुंखे कर्मचाऱ्यांनी जखमींना नागरिकांच्या मदतीने रूग्णालयात दाखल केले व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रय़त्न करत होते. अपघातात पोलिसांकडून जखमींना मदत करण्यासाठी धावपळ सुरू होती.