महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर कारवाई; आरबीआईकडून परवाना रद्द

मुंबई : महाराष्ट्रातील आणखी एका बँकेवर आरबीआयकडून कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयकडून कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द झाला आहे. बँकेच्या कारभारातील समस्यांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरबीआयने कारवाईमागील कारण सांगताना माहिती दिली आहे की, सुभद्रा बँकेचे कामकाज सध्याच्या आणि भविष्यातील ठेवीदारांच्या हितासाठी हानिकारक ठरेल अशा पद्दतीने करण्यात आले होते. अशाच पद्दतीने त्यांना कामकाज सुरु ठेवण्याची परवानगी दिली तर जनतेच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

२४ डिसेंबरला आरबीआयने बँकेच्या गैरकारभारामुळे कोल्हापूरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा बँकिंग परवाना रद्द करत असल्याची माहिती दिली आहे. गुरुवारपासूनच बँकेचं कामकाज बंद करण्यात आलं आहे. रिझर्व्ह बँकेने आधीच सुभद्रा बँकेच्या व्यवहारावर निर्बंध आणले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली. यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरबीआय यासंबंधी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे. दरम्यान सुभद्रा लोकल एरिया बँके सर्व ठेवीदारांची भरपाई करण्यास समर्थ असल्याचं आरबीआयने स्पष्ट केलं आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात बँकेच्या एकूण १३ शाखा आहेत. 2003 मध्ये उद्योगपती अण्णासाहेब मोहिते यांनी या बँकेची स्थापना केली होती.