धक्कादायक: मराठवाड्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे कोरोनामुळे निधन
बातमी मराठवाडा

धक्कादायक: मराठवाड्यातील काँग्रेसच्या विद्यमान आमदारांचे कोरोनामुळे निधन

नांदेड : कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे दिसून येत असून देगलूर- बिलोली मतदार संघाचे आमदार रावसाहेब जयवंतराव अंतापूरकर (वय 63 वर्ष) यांचे मुंबई येथे शुक्रवारी रात्री ११.२० वाजता निधन झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काल शुक्रवारी सायंकाळी आमदार अंतापूरकर यांच्या निधनाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. मात्र निधनाचे वृत्त अधिकृत नसल्याचे जाहीर केल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करत होते. मात्र रात्री ११ वाजून २० मिनिटाला निधनाचे वृत्त बॉम्बे हॉस्पिटल प्रशासनाने अधिकृतपणे जाहीर केले आहे.

आ. अंतापुरकर वाजून यांच्यावर गेल्या १५ दिवसापासून तेथे कोरोनावर उपचार सुरू होते. त्यांच्या ऑक्सीजनचा स्तर शुक्रवारी सकाळी ७१ होता. रात्री १० वाजता तो २८ पर्यंत खालावला. व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते.

आ. अंतापुरकर हे बिलोली – देगलूर विधानसभा मतदारसंघात यापूर्वी २००९ ते २०१४ दरम्यान काँग्रेसचे आमदार होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून ते दुसऱ्यांदा निवडून आले.

अशोक चव्हाणांकडून श्रद्धांजली

माझे निकटचे सहकारी व देगलूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई येथे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. आ. रावसाहेब अंतापूरकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली व त्यांच्या कुटुंबियांना हे अपरिमित दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, ही प्रार्थना.