शेअर बाजारात तेजी; नव्या विक्रमाची नोंद
देश बातमी

शेअर बाजारात तेजी; नव्या विक्रमाची नोंद

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठी तेजी आली असून विक्रमी वाढ झाली आहे. शेअर बाजार उघडताच सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ५७ हजारांच्या पार गेला. पहिल्यांदाच सेन्सेक्सने ५७ हजारांचा पल्ला गाठला आहे. महिन्याभरात सेन्सेक्समध्ये ४ हजार अंकांची वाढ झाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शेअर बाजारात असाच उत्साह दिसला तर ऑक्टोबरपूर्वी सेन्सेक्स ६० हजारापर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शेअर बाजारातील वाढत्या गुंतवणुकीमुळे सेन्सेक्समध्ये वाढ झाल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सेन्सेक्ससोबत निफ्टीतही वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रात निफ्टी १७ हजारापर्यंत पोहोचला होता. निफ्टीची आतापर्यंत सर्वात मोठी वाढ आहे.

भारतीय शेअर बाजारात या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच सोमवारी उत्साहाचं वातावरण दिसून आलं होतं. बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टीने विक्रमी स्तर गाठला होता. बीएसई सेन्सेक्स २०५ अंकांच्या तेजीसह सुरु झाला. तेव्हा सेन्सेक्स ५६,३२९.२ होता. त्यानंतर बाजार बंद होताना सेन्सेक्स ८३४ अंकासह ५६,९५८.२७ वर पोहोचला होता. शेवटी सेन्सेक्स ७६५.०४ अंकासह ५६,८८९.७६ अंकांवर बंद झाला. याचबरोबर निफ्टीही सोमवारी ७० अंकांच्या वाढीसह १,७७५.८५ वर सुरु झाला. बाजार बंद होता निफ्टी २२५.८५ अंकांसह १६,९३१.०५ वर बंद झाला होता.