कोरोनाची दुसरी लाट; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपेंच्या विधानाची चर्चा
कोरोना इम्पॅक्ट बातमी

कोरोनाची दुसरी लाट; महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन? राजेश टोपेंच्या विधानाची चर्चा

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असून पुन्हा एकदा लॉकडाउन लागणार का? हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन हवा की थोड्या निर्बंधासहीत मोकळेपणाने रहायचे आहे हे जनतेने ठरवावं, असं म्हटलं आहे. त्यातच आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लॉकडाउन हा शेवटचा पर्याय असेल असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं असून त्यांच्या या विधानाची चर्चा होत आहे. यावरून महाराष्ट्रा पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असा प्रश्नही सतावू लागला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

स्थानिक जिल्हाधिकारी, आयुक्तांना पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. त्यांच्या स्तरावर करोना नियंत्रित करण्यासाठी ज्या उपाययोजनांची आवश्यकता आहे त्या त्यांनी कराव्यात अशी सूचना आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी रुग्ण वाढत आहेत तिथे या उपाययोजना केल्या जातील. मात्र लॉकडाउन हा सर्वात शेवटचा पर्याय असेल. याचा अर्थ आपण त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. गरज लागेल त्याप्रमाणे काळजी घेतली जाईल, असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

जिथे खूप गर्दी असते तिथे सातत्याने करोना चाचणी करणं, अधिक कठोर पद्धतीने नियमांचं पालन करणं महत्वाचा विषय वाटतो, असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं. मुंबई लोकलचा दुसरा टप्पा सुरु झाल्यामुळे करोना रुग्ण वाढलेत अशातला भाग नाही. मुंबईच्या आयुक्तांनीही फार वाढ झालेली नाही आणि होणार नाही असं स्पष्ट केलं आहे. त्यांनी खात्री दिली आहे. पण आपल्याला काटेकोरपणे नियमांचं पालन करावं लागेलच, असे टोपे म्हणाले.