लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण
देश बातमी

लस घेतलेल्या स्वयंसेवकाचे सीरम इन्स्टिट्युटवर गंभीर आरोप; पुनावाला यांचे स्पष्टीकरण

पुणे : सीरम इन्स्टिट्युटने विकसित केलेल्या कोरोना लसीवर एका स्वयंसेवकाने गंभीर आरोप केले आहेत. तसेच तसेच लस तपासणी करणे थांबवण्याची मागणीदेखील केली आहे. चेन्नई येथे सुरु असलेल्या लसीच्या चाचणीत या स्वयंसेवकाला १ ऑक्टोबर रोजी लस देण्यात आली होती. मात्र या व्यक्तीने व्हर्च्युअल न्यूरोलॉजिकल ब्रेकडाऊन आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत झाल्याची तक्रार करत सीरम इन्स्टिट्युटला आणि इतरांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या व्यक्तीने ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि औषधी कंपनी अ‍ॅस्ट्रॅजेनेका यांच्याशी करार केलेल्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला (एसआयआय) या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या व्यक्तीने नोटीसमध्ये असा आरोप केला आहे की, लसीकरणानंतर त्याला तीव्र एन्सेफॅलोपॅथी, मेंदूला हानी पोहोचवणाऱ्या आजाराची लागण झाली आहे. सर्व तपासन्यांमध्ये स्पष्ट झालं आहे की लसीच्या चाचणीने आरोग्य स्थिती बिघडली आहे. त्यामुळे ही लस असुरक्षित असून याची चाचणी, उत्पादन आणि वितरण थांबवण्याची मागणी केली आहे. त्यासोबतच कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला.

सीरम इन्स्टिट्युने आरोप फेटाळून लावले
मात्र, ”स्वयंसेवकाने नोटीसद्वारे केलेले आरोप चुकीचे आहेत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल सहानुभूती दर्शवत आहे. मात्र कोरोना लसीची चाचणी व स्वयंसेवकाच्या वैद्यकीय स्थिती यांचा काहीही संबंध नाही.” असे म्हणत आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने एक निवेदन जारी करत स्पष्तोकरण दिले आहे. ” स्वयंसेवक त्याच्या वैद्यकीय समस्यांचा दोष कोरोना लस चाचणीवर चुकीच्या पद्धतीने करत आहे. या स्वयंसेवकाकडून चुकीच्या पद्धतीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची बदनामी केली जात आहे. सीरम इन्स्टिट्यूट यासाठी 100 कोटींपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी करेल आणि अशा दाव्यांपासून बचाव करेल,” असं सीरम इन्स्टिट्युटने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.