लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार
देश बातमी

लहान मुलांनाही देण्यात येणार कोरोना लस; या महिन्यांपासून सीरम तयार

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सर्वजण चिंतेत होते. परंतु, लसीकरणांसाठी वेग आल्यानतंर लहान मुलांनाही लस देण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट 21 जूनपासून भारतात सर्वांसाठी मोफत लसीकरण होणार आहे. त्याआधीच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

लहान मुलांना आता पुण्याच्या सीरमची इन्स्टिट्यूटची नोवोवॅक्स लस दिली जाणार आहे. भारतात या लशीच्या क्लिनिकल ट्रायलला परवानगी देण्यात आली आहे. सध्या भारतात भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीला लहान मुलांवर ट्रायलसाठी परवानगी देण्यात आली आहे. आता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटही लहान मुलांना कोरोना लस देण्याच्या तयारीत आहे. नोवोवॅक्स लशी जुलैमध्येच लहान मुलांवर क्लिनिकल ट्रायल करण्याचा कंपनीचा विचार आहे.

दोन दिवसांपूर्वीच नोवोवॅक्स या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे परिणाम जारी करण्यात आले. नोवोवॅक्स म्हणजेच NVX-CoV2373 कोरोना लस. 29 हजार 960 लोकांवर या लशीचं ट्रायल घेण्यात आलं आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या लशीचा एकूण प्रभाव 90.4 टक्के आहे. तर मध्यम आणि तीव्र आजारापासून संरक्षण देण्यात ही लस 100 टक्के प्रभावी आहे. नोवाव्हॅक्सने सांगितलं, यूएस आणि मेक्सिकोमध्ये या लशीची चाचणी घेण्यात आली. कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिएंट्सपासून ही लस सुरक्षात देते. सर्वात जास्त प्रभावी आहे. प्राथमिक अहवालानुसार ही लस सुरक्षित आहे आणि जवळपास 90% प्रभावी आहे.