धक्कादायक ! इस्रोच्या शास्त्रज्ञाला जीवे मारण्याचा प्रयत्न; फेसबुक पोस्टमधून स्वतःच केला खुलासा
देश बातमी

धक्कादायक ! इस्रोच्या शास्त्रज्ञाला जीवे मारण्याचा प्रयत्न; फेसबुक पोस्टमधून स्वतःच केला खुलासा

अहमदाबाद : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे संशोधक आणि माजी संचालक तपन मिश्रा यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला, असा खळबळजनक दावा केला आहे. एका फेसबुक पोस्टमधून त्यांनी गेल्या दोन -तीन वर्षात त्यांच्यासोबत घडलेल्या गोष्टीची माहिती दिली आहे. २०१७ मध्ये तपन मिश्रा यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाला. असे असे त्यांनी आपल्या फेसबुकपोस्टमध्ये सांगितले आहे. तसेच, जानेवारी महिन्यात ते सेवा निवृत्त होत आहेत. त्यामुळे मी मेलो तरी त्यांच्यासोबत काय घडल हे लोकांना माहित असायला हवं म्हणून त्यांनी ही फेसबुक पोस्ट केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काय लिहिले आहे तपन मिश्रा यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये
मला विष कोणी आणि का दिलं याबाबत मला कल्पना नाही, बंगळुरू येथील मुलाखतीवेळी मला नाश्त्यातून विष देण्यात आलं होतं, घरी जे आर्सेनिक दिलं जातं, ते ऑर्गेनिक होतं. जे विष मला दिलं होतं ते इनऑर्गेनिक ऑर्सेनिक होतं, याचे एक ग्राम प्रमाणही कोणत्या मनुष्याला जीवे मारण्यासाठी पुरेसे असतं.

२३ मे २०१७ मला जीवघेणा आर्सेनिक ट्रायऑक्साइड(Arsenic Trioxide) देण्यात आलं होतं, यानंतर मागील २ वर्षापासून माझी अवस्था बिकट झाली होती, मुलाखतीनंतर कठीण प्रसंगातून मी बंगळुरूहून अहमदाबादला परतलो होतो. याठिकाणी आल्यानंतर मला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा स्थानिक रूग्णालयात दाखल झालो, श्वास घेण्यास त्रास झाला, शरीराची त्वचा निघत होती, हातापायाच्या बोटांमधून नखे निघू लागली, न्युरोलॉजिकल समस्या उद्भवल्या, सौम्य ह्दयविकाराचा झटका आला, फंगल इंफेक्शन सुरू झालं.

त्यानंतर मी अहमदाबादच्या जायडस कॅडिला, मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, दिल्लीच्या एम्समध्ये उपचार घेतले. या विषप्रयोगानंतर मला सलग २ वर्ष उपचार घ्यावे लागले त्यामुळे आजपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही, मी भाग्यवान आहे कारण हे विष प्यायल्यानंतर कोणीही जिवंत वाचू शकत नाही. मी जानेवारी महिन्यात निवृत्त होणार आहे, त्यामुळे मी मेलो तरी माझ्यासोबत काय घडलं हे लोकांना माहिती असायला हवं म्हणून मी ही पोस्ट करत आहे.

इस्त्रोमध्ये मोठ्या वैज्ञानिकांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच्या बातम्या मिळतात, १९७१ मध्ये प्रोफेसर विक्रम साराभाई यांचाही संशयास्पद मृत्यू झाला, त्यानंतर १९९९ मध्ये VSSC चे संचालक डॉ. एस. श्रीनिवासन यांच्या मृत्यूवरही प्रश्न उपस्थित केले गेले, इतकचं नाही तर १९९४ मध्ये श्री नांबीनारायणचं प्रकरणही सगळ्यांसमोर आलं होतं, पण मी एक दिवस या रहस्याचा भाग बनेन, अशी महाला पुसटशीही कल्पना नव्हती.

दरम्यान, तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये पुरावा म्हणून तपास रिपोर्ट, एम्सची कागदपत्रे, हातापायाचे फोटो अपलोड केले आहेत. तसेच, तपन मिश्रा यांनी फेसबुक पोस्टमध्ये एम्समधील मेडिकल रिपोर्टचे फोटोही जोडले आहेत.