धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या
देश बातमी

धक्कादायक! लैंगिक अत्याचारातील आरोपीने पिडीत मुलीच्या वडिलांनाच झाडल्या गोळ्या

हाथरसमध्ये पुन्हा काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. २०१८ मध्ये लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेल्या आरोपीने जामीन मिळाल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले. त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

हाथरसचे पोलीस प्रमुख विनीत जयस्वाल यांनी ट्विटरवर दिलेल्या व्हिडिओ निवेदनात म्हटले आहे की, 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी गौरव शर्माला एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. ‘मृताने जुलै २०१८ मध्ये आरोपीविरोधात लैंगिक शोषणासाठी गुन्हा दाखल केला होता. आरोपी तुरूंगात गेला आणि महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर गौरव शर्माला स्थानिक कोर्टाने जामीन मंजूर केला, त्यानंतर तो बाहेर होता.

पीडित मुलीच्या वडिलांनी त्याच्याविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. दोन्ही कुटुंबात तणाव निर्माण झाले असून चांगले संबंध नव्हते. आरोपीची पत्नी व काकू दोघेही गावातील मंदिर पूजेसाठी आले होते. पीडित मुलगी आणि तिची बहीण तिथे आधीच हजर होते. इथल्या एका गोष्टीवरून महिलांमध्ये भांडण चालू होते. यानंतर आरोपी व पीडितेचे वडीलही भांडणात सामील झाले आणि भांडण टोकाला गेले. सोमवारी यानंतर आरोपी संतप्त झाला आणि त्याने आपल्या कुटूंबाच्या इतर मुलांना बोलावून पीडित मुलीच्या वडिलांना गोळी घातली. पीडितेच्या वडिलांचा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.