पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी
देश बातमी

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट; 6 भाजप कार्यकर्ते जखमी

मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत एकीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना दुसरीकडे राजकीय हिंसाचारही तीव्र होत आहे. विधानसभा निवडणुकी आधी बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. यात भाजपचे सहा कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या स्फोटामागे तृणमूलचा हात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या बॉम्बस्फोटात सहा भाजप कार्यकर्ते जखमी झाले आहेत. या घटनेनंतर भाजपाने तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार रामपूर गावात झालेल्या बॉम्बस्फोटात भाजपचे सहा नेते जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, असा आरोप केला जात आहे की ज्यावेळी हे सर्व कामगार एका विवाह सोहळ्यावरून परत येत होते. त्यावेळी टीएमसी कामगारांनी त्यांच्यावर बॉम्ब फेकले. शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याचबरोबर भाजप आपल्या उमेदवारांची यादीही जाहीर करेल. बंगालमध्ये निवडणुका होण्यापूर्वी सतत हिंसाचार झाल्याचे वृत्त आहे.