तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा
देश बातमी

तर… त्यांनी कोव्हॅक्सिन लस घेऊ नये; भारत बायोटेकचा इशारा

मुंबई : केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी दोन लसींना मंजुरी दिल्यानंतर देशभरात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधात लसीकरण मोहिमेला जोरात सुरवात झाली. मात्र तिसऱ्या टप्प्यात भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनच्या चाचण्यां पाहता लस टोचून घेणाऱ्या लोकांसाठी एक सूचना प्रसारित केली आहे. यामध्ये अनेक प्रकारची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

एका व्हॉलिंटिअरचा मृत्यू झाल्याने त्याचे कुटुंबीय न्य़ायालयात गेले आहेत. तर एका डॉक्टरनेच कोव्हॅक्सिन नको, कोविशिल्ड लस हवी असे सांगत लसीकरण नाकारले आहे. त्यामुळे स्वदेशी कंपनी भारत बायोटेकची लस कोव्हॅक्सिन लस वादात सापडलेली आहे. त्यानंतर कंपनीने स्वतःच कोव्हॅक्सिन कोणी घ्यावी, कोणी नाही याची माहिती दिली आहे.

भारत बायोटेकने ब्लिडिंग डिसऑर्डर असलेल्या लोकांनादेखील लस न घेण्याचा सल्ला दिला आहे. जे लोक गंभीर स्वरुपात आजारी आहेत, ताप आहे किंवा त्यांना कोणत्याही अॅलर्जीचा इतिहास आहे, गर्भवती किंवा स्तनदा माता यांनी लसीपासून दूर रहावे, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच लस टोचलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसले तर त्याला तातडीने उपचारासाठी घ्यावेत, असेही कंपनीने म्हंटले आहे.

त्यानुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे किंवा प्रतिकारशक्तीवर परिणाम करणारे कोणतेही औषध घेत असतील तर त्यांनी कोव्हॅक्सिन लस टोचून घेऊ नये. या आधी सरकारने सांगितले होते की, किमोथेरपी, एड्स झालेले आणि स्टेरॉईड घेत असलेल्या लोकांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते. या लोकांना कोरोनाचे संक्रमण वेगाने होऊ शकते, अशा लोकांमध्ये ही लस कमी प्रभावी असेल. परंतू आता त्यांच्यावर या लसी काम करत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.