पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश
बातमी मराठवाडा

पत्रकाराचा मुलगा बनला आयएएस; पहिल्याच प्रयत्नात यश

नांदेड : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला आहे. यामध्ये नांदेडमधील एका सामान्य कुटुंबातील सुनिलकुमार धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात आयएएस होण्याचे स्वप्न साकार केले आहे. विशेष म्हणजे सुमित कुमार यांचे वडील हे पत्रकार तर आई दिव्यांग असून त्या शिक्षिका आहेत. नांदेड शहरातील विजयनगर भागात राहणारे दत्ताहरी धोत्रे हे पत्रकारिता करतात त्यांच्या पत्नी सूर्यकांता दत्ताहरी धोत्रे या खाजगी शाळेवर प्राथमिक शिक्षिका आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सूनिलकुमार धोत्रे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण टाइनी इंग्लिश स्कूल येथून झाले. सुमित कुमार या दहावीला १०० पैकी १०० टक्के मिळाले होते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून तो राज्यात पहिला आला होता. याबद्दल सुमित कुमार यांना केंद्र सरकारकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल मिरीट अवार्ड मिळाला होता. त्यांचे बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण केंद्र सरकारच्या योजनेतून झाले. १२वी नंतर झालेल्या जेईई मेन्स परीक्षेतही ते टॉपर आले होते.

त्यांनी १२वी नंतर त्याने खडकपूर येथून बी.टेक. ही डिग्री इलेक्ट्रिशियन या विषयात पूर्ण केली. त्यानंतर कॅम्पस मुलाखतीमधून ते एका मोठा कंपनीत नोकरीला लागले. मात्र, दोन महिने नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा देत यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. सुमितकुमार धोत्रे यांनी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या भारतीय वनसेवा, भारतीय पोलिस सेवा, भारतीय प्रशासकीय सेवा या तिन्ही प्रकारच्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. यात त्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला असून या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात त्यांनी मोठे यश संपादन केले आहे. या यशाबद्दल बोलताना सुमितकुमार यांचे वडील पत्रकार दत्ता धोत्रे म्हणाले की, माझ्या मुलाला या यशात आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दीपक कदम यांचा मोठा फायदा झाला असून दीपक कदम यांनी सुमित कुमार यांची संपूर्ण तयारी करून घेतली. सुशिल कुमार यांचे यश पाहून आई सूर्यकांता धोत्रे यांना आनंदाश्रू आले. त्या म्हणाल्या, माझ्या मुलाचे कष्ट कामी आले आहेत. माझा मुलगा या सेवेच्या माध्यमातून देशाचे नाव करेल.