फुटपाथवर जावून लोकांची चौकशी करणारा भन्नाट राज्यमंत्री
राजकारण

फुटपाथवर जावून लोकांची चौकशी करणारा भन्नाट राज्यमंत्री

मुंबई : मंत्री म्हटलं की पांढरा नेहरु, त्यावर रंगीबेरंगी जॉकेट, पायात कोल्हापूर चप्पल असा रुबाबदार थाट पाहायला मिळतो. मात्र काही मंत्री अतिषय साधे राहणीमान आणि कृतीशील असतात. साधा पांढरा शर्ट, काळी पॅंट आणि खिशाला १० रुपयाची पेन लावून प्रश्न तेथे जनता दरबार भरवणारे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे अशाच एका भन्नाट कारणामुळे सध्या चर्चेत आहेत. अचानकपणे प्राजक्त तनपुरे यांनी विना पोलीस प्रोटेक्सन शिवाय एका साध्या गाडीतून थेट मंत्रालायासमोरील फुटपाथवर राहणाऱ्या पारधी समाजाच्या वस्तीला भेट दिली. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आस्थेने विचारपूस केली, त्यांचे विविध प्रश्न समजून घेतले आणि महिला व युवकांशी चर्चा केली.

पारधी समाजातील युवक कशा ऑनलाईन शिक्षण घेत आहेत यांची प्रत्यक्ष माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी जाणून घेतली. ‘शिक्षण परीवर्तनाचे माध्यम आहे, त्यामुळे युवकांनी उच्च शिक्षण घेण्याचा सल्ला देवून त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वस्तीवरील नागरीक भारावून गेले. लहानमुले कुतुहलाने हे पाहत होती. त्यांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी खाऊ वाटप केले, त्यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर स्मित साह्य फुलले. पारधी कुटुबांतील मुलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी तातडीने मंत्रालयात बैठक बोलावण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना दिल्या.