कोरोना काळातही या कंपनीच्या कर्माचाऱ्यांना ६ महिन्यांत दुसऱ्यांदा पगारवाढ
बातमी महाराष्ट्र

कोरोना काळातही या कंपनीच्या कर्माचाऱ्यांना ६ महिन्यांत दुसऱ्यांदा पगारवाढ

मुंबई : होळीआधी टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. कोरोना काळातही टीसीएसच्या कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पगारवाढ मिळणार आहे. टीसीएस आपल्या कर्मचाऱ्यांना २०२१-२२ साठी पगारात वाढ करून देणार आहे. गेल्या ६ महिन्यांत असं दोनदा घडलंय, जेव्हा टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

६ ते ७ टक्क्यांनी ही पगारवाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या पगारवाढीचा फायदा तब्बल ४.७ लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यामुळे होळीआधी कर्मचाऱ्यांना मिळालेली ही खूप मोठी खूशखबर आहे.

२०२० असं वर्ष जेव्हा कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये अनेकांवर आर्थिक संकट कोसळलं, अशा परिस्थितीतही टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले होते. तेव्हा झालेली पगारवाढ आणि आता होणारी पगारवाढ लक्षात घेता, कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास १४ ते १५ टक्क्यांनी वाढ होणार आहे. केवळ पगारवाढच नाही तर टीसीएसने आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रमोशनही केलं होतं. आता पुन्हा होणारी पगारवाढ हेच संकेत देतेय, की कोरोना काळातही टीसीएस स्वत:चं अर्थचक्र रूळावर आणत आहे.