सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा; अन् शशी थरुर यांनी मागितली माफी
देश बातमी

सुमित्रा महाजन यांच्या निधनाची अफवा; अन् शशी थरुर यांनी मागितली माफी

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांनी लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या निधनाच्या केलेल्या एका ट्विटमुळे चांगलाच गोंधळ उडला. थरुर यांनी ट्विटरवरुन लोकसभेच्या माजी अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचा मृत्यू झाल्याचं ट्विट करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. मात्र, मध्य प्रदेश भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी ट्विट करुन सुमित्रा महाजन यांची प्रकृती ठणठणीत असून चिंता करण्याची गरज नाही असं म्हटलं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर थरुर यांनी माफी मागत आपलं ट्विट डिलीट केलं. मात्र थरुर यांच्या या ट्विटमुळे प्रसारमाध्यमांपासून ते अनेक व्हेरिफाइड अकाऊंट असणाऱ्या नेत्यांनी सुमित्रा महाजन यांच्या मृत्यूसंदर्भात चुकीच्या माहितीच्या आधारे ट्विट केलं. यामुळेच सुमित्रा महाजन यांच्या संदर्भातील हॅशटॅग ट्विटरवर टॉप ट्रेण्ड होता.

थरुर यांनी गुरुवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास सुमित्रा महाजन यांचा फोटो ट्विट करत त्यांचं निधन झाल्याचं ट्विटरवर म्हटलं. थरुर यांनी महाजन यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजलीही अर्पण केली. मात्र, त्यानंतर ११ वाजून ३३ मिनिटांनी कैलास विजयवर्गीय यांनी थरुर यांचं ट्विट कोट करुन रिट्विट करत, ताई एकदम ठणठणीत आहेत, देव त्यांना दिर्घायुष्य देवो, असं ट्विट केलं. या ट्विटवर थरुर यांनी रिप्लाय केला. धन्यवाद कैलास विजयवर्गीय. मी माझं ट्विट दिलं आहे. लोकं अशा बातम्या कोणत्या वाईट विचारसणीने पसरवतात कळत नाही. मी सुमित्राजींच्या आरोग्यदायी आणि दिर्घायुष्यासाठी प्रादर्थना करतो, असं थरुर म्हणाले.

नंतर परत एक ट्विट करताना थरुर यांनी, सुमित्र महाजन यांची प्रकृती उत्तम आहे ऐकून समाधान वाटलं. मला एका व्यक्तीकडून ही माहिती मिळाली होती जी मला खरी वाटली. चूक सुधारली आणि आणि यावरुन बातमी करणाऱ्यांनीही ती सुधावारी असं आवाहन करतो, असं म्हटलं होतं.