उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू
बातमी

उन्नाव पुन्हा हादरलं; शेतात ओढणीत गुंडाळलेल्या अत्यावस्थेत सापडल्या तीन मुली; दोघींचा मृत्यू

उत्तरप्रदेश : चारा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या तिन्ही मुली शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याची बातमी समोर आली आहे. उन्नाव जिल्ह्यातील असोहा परिसरातील बाबुराहा गावाजवळ तीन मुली बुधवारी चिंताजनक स्थिती आढळल्या झाल्या. यामधील दोघींचा मृत्यू झालेला असून एका मुलीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर मुलींचा शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे. शवविच्छेदन अहवालाच्या आधारे मुलींच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाऊ शकते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उन्नावचे पोलीस अधीक्षक आनंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन मुलींचा रुग्णालयात मृत्यू झाला असून एकीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिकदृष्ट्या मुलींवर विषप्रयोग करण्यात आल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर असून घटनास्थळी काही पुरावेदेखील सापडले आहेत. तसेच, तपासासाठी पोलिसांची सहा पथकं तयार करण्यात आली आहेत. डॉक्टरांनी विषप्रयोग झाल्याची लक्षणं दिसत असल्याचं सांगितलं आहे. आमचा तपास सुरु असल्याचं आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं आहे. पोलीस सध्या शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत.

घटना उघडकीस आल्यानंतर आता पोलिसांनी गावकरी आणि पीडित मुलींच्या कुटुंबीयांची चौकशी सुरु केली आहे. परिसरात शेती असल्याने कुठेही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. लीस घटनास्थळी पोहोचले आणि तिन्ही मुलींना जवळच्या आरोग्य केंद्रात दाखल केलं. तेथे डॉक्टरांनी दोन मुलींना मृत घोषित केले. एका मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. त्या मुलीला उन्नाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे प्राथमिक उपचारानंतर तिला कानपूरला हलवण्यात आलं आहे. दुसरीकडे दलित संघटना आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी रुग्णालयात दाखल मुलीला चांगले उपचार मिळावेत यासाठी एम्समध्ये दाखल करावं अशी मागणी केली आहे.