यूपीएससीचा मोठा निर्णय; पुढे ढकलली पूर्व परीक्षा
देश बातमी

यूपीएससीचा मोठा निर्णय; पुढे ढकलली पूर्व परीक्षा

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं संकट निर्माण झालेलं आहे. या पार्श्वभूमीवर अनेक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या असताना आता केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) देखिल महत्वाचा निर्णय घेत २७ जून रोजी होणारी नागरी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकली आहे. ही परीक्षा आता १० ऑक्टोबर रोजी होणार आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपासून विद्यार्थी परीक्षा रद्द करण्याची मागणी करत होते. मागील वर्षी देखील करोना संसर्गाच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ३१ मे रोजी होणारी परीक्षा स्थगित करण्यात आली होती, त्यानंतर या परीक्षेचे ४ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन देखील टाकण्यात आलं आहे. यूपीएससी नागरी सेवा परीक्षा -२०२१ आणि भारतीय वन सेवा परीक्षा -२०२१ साठी २४ मार्ज पर्यंत अर्ज मागवण्यात आले होते.

दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या घोषणेनंतर बावीस दिवसांनी परीक्षा रद्द केल्याचा शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने बुधवारी प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे आता दहावीच्या परीक्षा अधिकृतरित्या रद्द झाल्या आहेत. दहावीची परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक/प्रमाणपत्र देण्याबाबत, अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत स्वतंत्रपणे निर्देश देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.