केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल
देश बातमी

केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल

नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे एकदा कोरोना झाल्यानंतर नॅशनल एक्स्पर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फॉर कोकेंद्र सरकारकडून लसीकरणाविषयीच्या नियमावलीत महत्त्वपूर्ण बदलविड १९ (NEGVAC) या तज्ज्ञ गटाच्या समितीने दिलेल्या सूचनांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा झेंडा दाखवला आहे. यात कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी लस देण्याची सूचना देण्यात आली होती. या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनामुक्त व्यक्तीला अँटीबॉडी किंवा प्लाझा दिले गेलेत. त्यांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याच्या तीन महिन्यानंतर कोरोनाची लस घेण्यास सांगितलं आहे. गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना ४ ते ८ आठवडे प्रतीक्षा करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच गर्भवती महिलांनी लस घ्यावी की नाही याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच याबाबत निर्णय होईल असं सांगण्यात आलं आहे.

पहिला डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण झाल्यास दुसऱ्या डोस कोरोनामुक्त झाल्यानंतर तीन महिन्यांनी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्तनपान करण्याऱ्या सर्व महिलांना कोरोनाची लस घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर करोना लस घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांची अँटीजन चाचणी करण्यास मनाई करण्यात आली आहे.