मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया
बातमी मुंबई

मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे. मुंब्रा रेतीबंदर येथे मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर ठाणे पोलिसांनी त्यांनी कळवा खाडीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली असल्याची माहिती दिली होती.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यानंतर, हिरेन यांच्या पत्नी विमल हिरेन यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली असून ते आत्महत्या करणं शक्य नसल्याचं सांगत पोलिसांनी चुकीची माहिती देऊ नये अशी विनंती केली आहे. यावेळी त्यांनी कांदिवली क्राइम ब्रांचमधील तावडे नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला आहे. मी आणि माझं कुटुंब असा विचारही करु शकत नव्हतं. आमची गाडी आठ दिवसांपूर्वी चोरी गेली होती. पोलीस जेव्हा कधी फोन करायचे माझे पती चौकशीसाठी जात होते. पोलीस तासनतास त्यांना बसवून ठेवायचे. कालही त्यांना बोलावलं होतं, ते गेले होते पण परत आले नाही. १० वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. कांदिवली क्राइम ब्रांचमधून तावडे म्हणून कोणाचा तरी फोन आला होता. ते गेल्यानंतर अर्ध्या तासात फोन बंद झाला. आम्ही रात्रभर वाट पाहिली. सकाळीपण काही पत्ता नसल्याने तक्रार दिली, असं विमल हिरेन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी पोलीस आत्महत्या केली असल्याचं सांगत आहेत त्यावरुन नाराजी व्यक्त केली. पोलीस त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगत आहे. ते कधीच आत्महत्येचा विचार करु शकत नाहीत. त्यांच्याबद्दल ही अफवा पसरवली जात असून खूप चुकीचं आहे. याचा पूर्ण तपास झाला पाहिजे. आमच्या कुटुंबाला याचा खूप त्रास होत आहे.