काय सांगता! हॉटेलच्या वॉशरुममध्येच महिलेने दिला बाळाला जन्म
देश बातमी

काय सांगता! हॉटेलच्या वॉशरुममध्येच महिलेने दिला बाळाला जन्म

राष्ट्रीय महामार्ग आठ वरील एका हॉटेलच्या प्रसाधनगृहातच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. कांकू राठवा असे प्रसूत झालेल्या महिलेचे नाव आहे. सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसमधून पती मितेश राठवा सोबत पंचमहाल जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी निघाली असताना वाटेतच महिला प्रसूत झाल्याची माहिती मिळाली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचे झाले असे की, राष्ट्रीय महामार्ग NH-8 वरून सार्वजनिक परिवहन सेवेच्या बसमधून कांकू राठवा पती मितेश राठवा सोबत पंचमहाल जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी निघाल्या होत्या. पालेज येथे बस थांबलेली असताना, कांकू एका हॉटेलच्या वॉशरुममध्ये गेल्या. मात्र त्यांना आधीपासून प्रसूती कला सुरु होत्या. या तीव्र कळामुळे कांकू अचानक खाली कोसळल्या.

यावेळी 108 क्रमांकावरुन रुग्णवाहिकेची सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या मदतीने या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. हॉटेलच्या वॉशरुममध्ये कांकु बाळंत झाल्या. राष्ट्रीय महामार्गावर हे हॉटेल अशा ठिकाणी आहे, जिथून कुठलेही रुग्णालय नजीक नाही. कांकु यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर हॉटेल मालकाने लगेच १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. मेडिकल टीममध्ये धर्मेश गांधी यांने सांगितले की, “आम्ही तिथे पोहोचलो, तेव्हा महिला विव्हळत होती. आम्ही तिची मदत करु शकलो, यात आनंद आहे.”