आपकडून या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!
राजकारण

आपकडून या राज्यातील मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराची केली घोषणा!

उत्तराखंड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने देखील उत्तराखंडच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल हे उत्तराखंडमध्ये दाखल झालेले आहेत. तसेच, त्यांनी या ठिकाणी आगामी विधासभा निवडणुकीसाठी आपचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण असणार, याबाबत घोषणा देखील केली. त्यानुसार निवृत्त कर्नल अजय कोटियाल हे आगामी आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असणार आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केजरीवाल म्हणाले की, आज मी दोन मोठ्या घोषणा करण्यासाठी आलो आहे. ज्या उत्तराखंडच्या विकासासाठी अतिशय महत्वपूर्ण असतील. मी गर्वाने जाहीर करू इच्छित आहे की, आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे कर्नल अजय कोटियाल असतील.

तसेच, केजरीवाल यांनी हे देखील सांगितले की, आम्ही सर्वेच्या माध्यमातून कर्नल कोटियाल यांच्या उमेदवारीबाबत लोकांचे मत जाणून घेतले. त्यावर लोकांनी सांगितले की आता आम्हाला देशभक्त फौजी हवा आहे. म्हणून कर्नल कोटियाल यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासाठी निश्चित करण्यात आले. हा निर्णय उत्तराखंडच्या लोकांनी घेतला आहे. अजय कोटियाल यांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. जेव्हा उत्तराखंडचे काही नेते येथील लोकांना लुटत होते, तेव्हा कोटियाल हे सीमेवर देशाचे रक्षण करत होते.