फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय – अशोक चव्हाण
राजकारण

फडणवीस आणि माझी दुश्मनी थोडीचंय – अशोक चव्हाण

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भेट झाली. त्यानंतर चव्हाण त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता खुद्द अशोक चव्हाण यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि माझी भेट झाली पण आमच्यात राजकीय चर्चा झाली नाही, असं अशोक चव्हाण म्हणालेत. देवेंद्र फडणवीस जरी दुसऱ्या पक्षात असले तरी त्यांची आणि माझी दुश्मनी थोडीच आहे तेव्हा… आम्ही चांगले मित्र आहोत, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी फडणवीसांसोबतच्या मैत्रीवर भाष्य केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ती गुप्त भेट
अशोक चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. ही गुप्त भेट आता उघड झाली आहे. अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच देवेंद्र फडणवीसही गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यात भेट झाली. तिथे त्यांच्यात काहीवेळ भेट झाली. त्यांच्यात झालेली भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

भेटीत काय झालं?
देवेंद्र फडणवीसांसोबत माझी भेट झाली. पण या भेटीत राजकीय चर्चा नाही. आम्ही खासगी विषयांवर बोललो, असं अशोल चव्हाण म्हणाले आहेत.