बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी
राजकारण

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी

नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री येडीयुरप्पांच्या राजीनामामुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण? यावरून भाजप पेचात सापडली होती. त्यानंतर आज (ता. २७) भाजपने कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली. बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. बोम्मई हे येडीयुराप्पा सरकारमध्ये गृहमंत्री होते. धर्मेंद्र प्रधान यांनी आज बोम्मई यांच्या नावाची घोषणा केली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही नावे होती चर्चेत
खाण मंत्री मुरगेश निरानी, गृहमंत्री बसवराज बोमाई, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आणि बसवंगौडा पाटील यतनाल यांची नावे मुख्यमंत्री पदांसाठी चर्चेत होती. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे यांचेही नाव चर्चेत आले होते. दिल्लीत येडीयुराप्पा यांनी माझ्या मर्जीतला नेताच मुख्यमंत्री करावा अशी अट घातली होती. यानुसार भाजपाने सुवर्णमध्य साधत बोम्मई यांना मुख्यमंत्री पद दिले.

येडीयुराप्पांनी घातल्या होत्या तीन अटी
येडीयुराप्पा हे गेल्या आठवड्यात दिल्लीला गेले होते. दोन दिवस त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली होती. यानंतर राज्यात येत त्यांनी 26 जुलै रोजी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. येडींनी दिल्लीच्या नेत्यांसमोर तीन अटी ठेवल्या होत्या. खासदार असलेला मोठा मुलगा बी. एस राघवेंद्रला केंद्रात मंत्रिपद, दुसरा मुलगा बी. एस. विजेंद्र याला राज्यात मंत्रिपद आणि मुख्यमंत्री मी सांगेन तोच, अशा या अटी होत्या.