महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव
राजकारण

महाराष्ट्रीतील आदर्श सरपंचाच्या पॅनलचा धुव्वा; मुलीचाही पराभव

औरंगाबाद : संपूर्ण राज्यात आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या पाटोदा या गावात भास्करराव पेरे पाटील यांच्या पूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. भास्करराव पेरे यांनी त्यांचा संपूर्ण हयातीत पोटोदा या गावाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मात्र, यंदाच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा सामाना करावा लागला आहे. त्यांच्या पूर्ण पॅनलसोबतच त्यांची मुलगी अनुराधा पेरे यांचाही पराभव झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

30 वर्षानंतर पेरे पाटील पाटोद्याच्या राजकारणातून बाद झाले आहेत. या वर्षी पोटोदा येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चांगलीच चर्चेत आली होती. कारण यावेळी भास्करराव यांच्या विरोधात पॅनल उभे केले होते. एकूण 11 जागांपैकी 8 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. तर उर्वरित तीन जागांसाठी निवडणू झाली होती. मात्र या तिन्ही जागांवर भास्कर पेरे यांचे पॅनल पराभूत झाले आहे. येथील 11 जागांवर कपिंद्र पेरे पाटील यांनी विजय मिळवला आहे.

पाटोदा येथे भास्करराव पेरे पाटील यांची मुलगी अनुराधा पेरे यांच्याही पराभव झाला. त्यांना निवडणुकीत 186 मतं मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी दुर्गेश खोकड यांनी 204 मतं मिळवत निवडणूक जिंकली. मागील कित्येक वर्षांपासून भास्करराव पेरे यांनी पाटोदा ग्रामपंचायतीवर सत्ता गाजवलेली आहे. या काळात त्यांनी पोटादा गावाचा विकास करून गावाची किर्ती समस्त राज्यात पसरवली होती. त्यासाठी त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं. मात्र, यावेळच्या निवडणुकीत पेरे यांना पराभवाचा समाना करावा लागला. दरम्यान, राज्यातील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झाली आहे.