भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?
राजकारण

भाजपला खिंडार; दोन विद्यमान आमदारासह 2 मोठे नेते करणार राष्ट्रवादीत प्रवेश?

मुंबई : उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठी गळती लागली आहे. भाजपचे विद्यमान आमदार आणि दोन मोठे नेते लवकर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा लवकरच पार पडणार असे वृत्त न्यूज १८ लोकमतने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले काही आमदारांची पुन्हा घरवापसी होणार आहे, असे संकेत दिले होते. त्यानुसार आता काही आमदार आणि नेते हे परत राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी भुसावळचे भाजप आमदार संजय सावकारे यांचा 11 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. दरवर्षी वाढदिवसाच्यानिमित्त ते वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देत असतात. यंदाही जाहिरात देण्यात आली आहे पण या जाहिरातींमधून भाजपचे नेते आणि माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा फोटोच गायब आहे. महाजनांचा फोटोच प्रसिद्ध करण्यात आला नाही.

राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांचा फोटो जाहिरातींमध्ये असल्याने भाजप आमदार संजय सावकारे खडसे यांच्या पाठोपाठ हातात घड्याळ बांधून घरवापसी करणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार रंगली आहे. संजय सावकारे हे आधी राष्ट्रवादीमध्ये होते. 2009 मध्ये एकनाथ खडसे यांच्या वरदहस्ताने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन विधानसभा निवडणूक लढवून जिंकून आले होते.