राजस्थानात काँग्रेसला मोठा धक्का; भाजपची सरशी
राजकारण

राजस्थानात काँग्रेसला मोठा धक्का; भाजपची सरशी

रायपूर : राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस पक्षाला जोरदार धक्का बसला आहे. पंचायत समित्यांच्या एकूण ४ हजार ३७१ जागांपैकी भाजपने १९८९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या पदरात १८५२ जागा पडल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राजस्थानातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने काँग्रेसवर मात केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू असताना आपल्याला शेतकऱ्यांचा कौल मिळाला असल्याची प्रतिक्रिया या निकालाबाबत भाजपने दिली आहे.

पंचायत समित्यांच्या एकूण ४ हजार ३७१ जागांपैकी भाजपने १९८९ जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या पदरात १८५२ जागा पडल्या. जिल्हा परिषद स्तरावर, आतापर्यंत जाहीर झालेल्या ६३५ जागांपैकी ३५३ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले, तर काँग्रेसने २५२ जागा मिळवल्या आहेत.