ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो: साध्वी प्रज्ञा
राजकारण

ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो: साध्वी प्रज्ञा

भोपाळ: ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटल्यावर राग येत नाही, मग शुद्रांना शूद्र म्हटल्यावर राग का येतो असा वादग्रस्त प्रश्न भारतीय जनता पक्षाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केला आहे. वादग्रस्त वक्तव्यांमुळे साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कायम चर्चेत असतात. त्यांच्या या वक्त्यव्यामुळे आता नवा वाद ओढावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांनी मध्य प्रदेशच्या सिहोर येथील कार्यक्रमात जातीव्यवस्थेबाबत वक्तव्य केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

साध्वी प्रज्ञा यांनी या कार्यक्रमात बोलताना जाती व्यवस्थेचे समर्थन केले. प्राचीनकाळी आपल्या धर्मग्रंथांमध्ये समाजाच्या व्यवस्थेसाठी चार वर्ण तयार करण्यात आले होते. क्षत्रियाला क्षत्रिय म्हटल्यास राग येत नाही, ब्राह्मणाला ब्राह्मण म्हटल्यास राग येत नाही, वैश्याला वैश्य म्हटल्यास राग येत नाही, पण शुद्राला शूद्र म्हटलं तर त्यांना वाईट वाटतं. याचं कारण काय आहे? जातीव्यवस्थेबाबत असलेल्या गैरसमजातून हे घडत आहे. त्यांना ही गोष्ट समजतच नाही, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले.

राष्ट्रद्रोही कारवाया करणाऱ्या जनसमूदायाच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणले पाहिजे, असे वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केले. क्षत्रिय हे देशाचे रक्षण करतात, त्यामुळे त्यांनी अधिक मुलं जन्माला घालायला हवीत. क्षत्रियांचा वंशच संपला तर देशाचे रक्षण कोण करणार, असा सवाल साध्वी प्रज्ञा यांनी उपस्थित केला.