शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज
राजकारण

शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा, पोलिसांकडून लाठीचार्ज

बुलढाण्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा झाला आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरेंनी बुलढाण्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या केल्या होत्या. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी हा राडा झाला. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अखेर पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. मोठा तणाव यावेळी निर्माण झाला होता. शिंदे गटाचे समर्थक आणि ठाकरेंनी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्ते अशा दोघांमध्ये यावेळी घमासान झाल्याचं पाहायला मिळालं. हा राडा नियंत्रणात आणताना पोलिसांना अखेर आपली सगळी शक्ती पणाला लावाली लागली होती. यादरम्यान एकच गोंधळ निर्माण झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी हा राडा घातला. आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते हे शिवसेनेचा सत्कार सोहळा सुरु असताना त्या कार्यक्रमात घुसल्याचं सांगितलं जातंय. संजय गायकवाड यांच्या मुलासह त्यांच्या समर्थकांनी सत्कार समारंभात घुसून काही पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

पोलिसांसमोरच हा राडा झाला. यावेळी पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केला. ठाकरे गटाकडून जिल्ह्यातील नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच करण्यात आली होती. या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पण आम्ही शिवसेनेचे लोक आहोत, असा दावा करत गायकवाड यांच्या समर्थकांनी गोंधळ घातला. यावेळी शब्दाला शब्द वाढत गेला आणि पोलिसांसमोर दोन्ही गट भिडले. अखेर पोलिसांनी लाठीचार्ज करत हा सगळा राडा शांत करण्याचा प्रयत्न केला.